सिंधुदुर्ग – मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हे खाते देण्यात आले आहे. या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन नारायण राणे यांच्या अनुभवाचा देशासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे. नारायण राणे यांनी यापूर्वी महसूलमंत्री, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, विरोधीपक्ष नेता अशा महत्वाच्या मंत्रिपदाची यशस्वी जबाबदारी निभावलेली आहे. त्याच्या या अनुभवाचा फायदा देशाला आणि राज्याला होणार आहे.
खातेवाटप जाहीर : नारायण राणे देशाचे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
