आमदार प्रणितीताई शिंदे यांना महाविकास आघाडी मंत्रीमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे आज युवक काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक पार्क येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
आमदार प्रणितीताई शिंदे यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश न होण्यामागे केवळ आणि केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा हात असल्याचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना असल्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यानी सोनिया गांधी, राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे म्हणत खर्गे हटाव काँग्रेस बचाव असे जोरजोरात घोषणा दिल्या यामुळे चार हुतात्मा पुतळा परिसर दणाणून गेला होता.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, राजासाब शेख, संतोष अट्टेलूर, विवेक इंगळे, प्रवीण जाधव, राहुल गोयल, शाहू सलगर, अनिल मस्के, यल्लप्पा तुपदोळकर, सुभाष वाघमारे, विवेक कन्ना, सैफन शेख, आप्पाजी गायकवाड, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.