27 C
Panjim
Thursday, August 11, 2022

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सिंधुदुर्गात समुद्र्किनारे गजबजले व्यावसायिकही सुखावले

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारी आता पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. सडग्या म्हणावी तशी पर्यटकांची वर्दळ नसली तरी येणाऱ्या पर्यटकांमुळे व्यावसायिकही सुखावल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चांगलाच शुकशुकाट होता. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान त्यात पर्यटन व्यवसाय अडचणीत आल्याने जिल्ह्याची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. दरम्यान आता पर्यटक दाखल होऊ लागले आहेत.

पूर्ण देशात गेल्या ८ महिने कोरोना विषाणूंचा प्रादुभव वाढला होता, पूर्ण देश लॉकडाऊन झाला होता, त्यामुळे सर्वकाही ठप्प झाले होते ,मात्र आता ८ महिन्यानंतर नंतर पूर्व परिस्थिती येत आहे ,कोरोना संक्रमण रुग्ण कमी होत आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक आनंद घेण्यासाठी येताना दिसत आहेत. शिरोडा वेळागर किनाऱ्यावर पण लोकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटन व्यवसाय कोरोना काळात पूर्णपणे संकटात सापडला आहे. यात हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे, पण आता थोडा थोडा व्यवसाय सुरू होत आहे. प्रशासकीय नियम शिथिल होत असल्याने पर्यटक समुद्र किनाऱ्यावर वर्दळ करू लागले आहेत.

पर्यटक अभय सबनीस म्हणाले जवळपास एक वर्षाने आम्ही या किनाऱ्यावर येत आहोत. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे. मधल्या कोरोनाच्या काळात बाहेर पडता आलं नाही. गर्दीही पुष्कळ कमी आहे. असे तेम्हणाले.

पर्यटन व्यावसायिक निलेश मुळीक म्हणतात किती दिवसांपर्यंत या किनाऱ्यावर कोणीही दिसत नव्हतं पण आता हळूहळू लोक यायला लागली आहेत. हि गर्दी आगामी काळात वाढत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

परत पर्यटकांची याठिकाणी वर्दळ वडजली आहे. कोरून लवकरात लवकर जाईल आणि आमच्या कोकणात पूर्वीसारखी पर्यटकांची वर्दळ वाढेल अशी अपेक्षा येथील स्थानिक नागरिक आशिष सातळकर यांनी व्यक्त केली आहे.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img