कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अदानी – अंबानीच्या हातात जायला देऊ नका – कॉम्रेड वेणू नायर

0
137

सिंधुदुर्ग – कोकणात आल्यावर कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांची आठवण करणे गरजेचे आहे. कारण मधु दंडवते नसते तर कोकण रेल्वे झालीच नसती असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले.

रेल्वे युनियनच्या निवडणुकीवेळी कणकवलीत दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.

तसेच कोकण रेल्वेचे खाजगीकरण व्हायला द्यायचे नसेल तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन च्या पाठीशी उभे रहा अन्यथा खाजगीकरण झाले तर अदानी- अंबानी त्यांच्या हातात रेल्वे जाऊन सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल असे नायर यांनी सांगितले.

कणकवलीत रेल्वे कामगारांच्या हिताचे प्रश्न नेहमीच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने प्रमुखाने मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपनच बाजी मारणार असेही वेणू नायर यांनी बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here