मंगळवारी 18 जुलैपासून उत्तर कोकणात पावसाने जोरदार सुरवात केली आहे. त्यामुळे महाड व पोलादपूर पुन्हा एकदा पुराच्या छायेत आहेत. महाड नगर परिषद प्रशासनाकडून महाड शहरातील सर्व नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सावित्रि नदी खोर्यात मुसळधार पाऊस पडत आहे .गांधीरी व सावित्री नद्याची पातळी वाढत आहे . सर्व नागरिकांनी आपल्या सामानासह सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हाव व सतर्क राहावे असे आवाहन महाड नगर परिषदकडून मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील महाड व खेड ही दोन्ही शहर पुराच्या भीतीच्या छायेत आहेत.
सावित्री नदी इशारा पातळीच्या जवळ असल्याने महाड प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. रायगड महाड येथे जोरदार पाऊस सुरू ,महाबळेश्वर खोऱ्यातही पाऊस त्यामुळे आजचा दिवस महाड साठी पुन्हा एकदा भीतीचा करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. महाड व पोलादपूरच्या वेळी बाजूला असलेल्या सह्याद्री खोऱ्यात महाबळेश्वर येथेही जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड मध्ये कुंडलिका व पाताळगंगा नदी इशारा पातळीच्या वर असून धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.18 जुलै रोजी पोलादपूर तालुक्यात 152.00 मि. मी.मीपाऊस पडला आहे. पोलादपूर तालुक्यात आजपर्यंतचा एकूण पाऊस 1285.00 मि. मी.आहे दरम्यान महाड व पोलादपूर प्रशासन सज्ज झाले आहे. आंबा नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. रायगडात मुसळधार पाऊस नागोठणे येथेअंबा नदीही धोक्याच्या पातळी जवळ आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. महापुराचा नेहमीच धोका असलेल महाड व पोलादपूर परीसरावर मुख्याधिकारी महादेव रोडगे व प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे व पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांचे प्रशासन लक्ष ठेवून आहे. खेड नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती राणे व प्रांताधिकरी राजश्री मोरे यांचे प्रशासन सज्ज असून लक्ष ठेऊन आहेत.