कोकणात धबधब्यावर दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

0
867

 

कोकणात पावसाचा जोर असला तरी नियंत्रणात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे अद्यापतरी मुसळधार पाऊस झालेला नाही. सोमवारी १७ जुलै रोजी दुपारनंतरही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. पण खेड तालुक्यात जगबुडी नदी इशारा पातळीच्यावर सहा मीटर अंतरावर आहे.तिची धोकादाक पातळी सात मीटर आहे. रायगड जिल्ह्यात पातळगंगा व कुंडलिका व महाड ची सावित्रीनदी या नदया इशारा पातळी जवळ आहेत. रविवारी एक इसम रोहयाजवळ मासेमारी करताना बुडाला होता त्याचा पत्ता अद्याप मिळालेला नसतानाच अलिबाग रेवदंडा जवळ दोन जण धबधब्यावर पर्यटन करताना बुडाले आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग जवळ मौजे कोंडवे येथे रेवदंडा अलिबाग येथील इलान बेंजामिन वासकर वय वर्ष 25 व इजराइल व बेंजामिन वासकर वय वर्ष 23 मौजी कोंडवे येथील धबधब्यावरती गेले होते. आज दिनांक १७ जुलै रोजी वाहून गेले. एकूण एकूण चार जण या धबधब्यावर गेले होते मात्र त्यातील दोघांनी उडी मारलेली नाही म्हणून ते सुदैवाने सुखरूप बचावले आहेत. अलिबाग पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन बेपत्ता भावांचा शोध सुरू केला होता सायंकाळी उशिरा या दोन्ही सख्या भावाचे मृतदेह मिळाले आहेत. वडखळ पोलीस व प्रशासनाने यासाठी तातडीने शोधमोहीम राबवली होती.

दरवर्षी महापूराची धोका असलेल्या महाड व चिपळूण,खेड या ठिकाणी रायगड जिल्हा प्रशासन व रत्नागिरी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. महाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे यांनी महाड शहर परिसराचा व तालुक्याचा सायंकाळी उशिरा नदीच्या परिसरात फिरून आढावा घेतला असून नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत महाड प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

दरम्यान रविवार रात्री उशिरा एकजण मासे पकडत असताना आंबा नदीत बेपत्ता इसमाचा शोध लागलेला नाही.गटारीची हौस करणे हे या मित्रांच्या ग्रुपला भारी पडल आहे. दोन ते तीन जणांचा एक ग्रुप मासेमारी करण्यासाठी आंबानदी येथे गेला होता. याचवेळी मासेमारी करताना रोहा येथील नदीत एकजण वाहून गेल्याची दुर्दैवी धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची खबर पण महसूल विभाग पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती. महेंद्र किसन कांबळे असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे.

 

खबदारीचा व सुरक्षेचा जय्यत तयारीचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयात चिपळूण व रायगड जिल्हयात महाड येथे एनडीआरएफच्या दोन टीम दोन दिवसांपूर्वीच दाखल झाल्या आहेत.या दोन्ही पथकात श्वान पथकही तैनात आहे. कोकणात महापूराचा धोका असेलल्या चिपळूण शहरात सुरक्षेसाठी एनडीआरएफ ची टीम चिपळूण मध्ये दाखल झाली आहे. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा जिल्हा प्रशासनाने असे आवाहन केले आहे. एनडीआरएफची टीम शनिवारी सायंकाळी उशिरा चिपळूण येथे दाखल झाली आहे. या पथकात सदर टीममध्ये प्रत्येकी तीन अधिकारी, कॉन्स्टेबल हेड कॉन्सटेबल अठरा अशा एकूण दोन्ही टीम मिळून ३० ते ३५ जवानांचा सामावेश आहे. या प्रत्येक टीमसोबत एक श्वानपथकदेखील आहे.

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी धबधब्यावरती जाऊ नये अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र तरीही उत्साही पर्यटकांचा आनंद हा जीवावर बेतू लागला आहे. त्यामुळे आता पर्यटकांसाठी लावण्यात आलेल्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे रायगड प्रशासनाने करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here