कोकणातील चिपळूण येथील सवतसडा धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

0
2163

कोकणात दरवर्षी पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे हा पर्यटकांसाठी मोठा आकर्षणाचा विषय असतो. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबा’ प्रसिद्ध आहे. अन्य ठिकाणांच्या तुलनेत खुपच सुरक्षित असेलल्या हा धबधबा आहे पण असे असले तरी काळजी घेणे आवश्यकच आहे. हाही धबधबा आता खळखळून वाहू लागला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here