23.5 C
Panjim
Friday, March 31, 2023

केज कल्चर मासळीच्या विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – कल्चर अर्थात पिंजयातील मत्स्यपालन प्रकल्प यशस्वी करून दाखवत मच्छिमारांना रोजगाराचा एक पर्याय उपलब्धत झाला होता. मात्र तयार माशांची उचल तसेच उचित दर मिळत नसल्याने तोंडवळी येथील केज कल्चर करणारे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. केज कल्चर’ प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शासनाने मासळीच्या विक्रीसाठीचा पर्यायही उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील बचतगट करत आहेत.

ग्रामपंचायत, वनविभाग, कांदळवन कक्ष यांच्या सहकार्याने कालावल खाडी पात्रात पिंजऱ्यातील मत्स्यशेती प्रकल्प बचत गटांनी राबविले. या प्रकल्पातुन मासळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादनही झाले आहे मात्र तयार मासळीला म्हणावी तशी घाऊक उचल होत नसल्याने तसेच अपेक्षित दर मिळत नसल्याने काही बचत गटाची मासळी पिंजऱ्यात पडून आहे . मासळी फुकट जाऊ नये म्हणून त्यांना नाईलाजाने कमी दरात किरकोळ विक्री करावी लागत आहे.

या प्रकल्पासाठी पुरवठा करणाऱ्यांनी बीज पुरवताना लहान आकाराचे बीज पुरवले त्यामुळेच केज कल्चरच्या जाळ्यातून वाहून गेले. तर उर्वरित बीजपासून तयार झालेली मासळीला योग्य ग्राहक नसल्याने नुकसान झाल्याचे गावचे माजी सरपंच संजय केळुसकर यांनी सांगितले. हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. 4 हजार बीज म्हणजे लहान मासे सोडले तर साधारणपणे चार ते पाच लाखाचे उत्पन्न प्राप्त होईल असे सांगण्यात आले परंतु आज मासळीला योग्य ग्राहक व उचल न मिळाल्याने 70 ते 80 हजार रुपये हातात आले आहेत. बीज खरेदीसाठी शासन एकदाच अनुदान देते पुढील उत्पादनासाठी बीज खरेदी करायचे झाले तर 2 लाख रुपयांची आवश्यकता आहे. हातात 70 ते 80 हजार रुपये मिळाले असताना हे 2 लाख कसे उभे करणार आणि हा प्रकल्प कसा चालू ठेवणार असा प्रश्न आपल्यासह इतरांसमोर उभा असल्याचे केळुसकर म्हणाले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles