कुतूहल अवकाशाचे’ कार्यक्रमात २१ शाळांचा सहभाग!

0
114

 

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड या सेवाभावी संस्थेच्या वतीने जामसंडे, पोंभुर्ले आणि पडेल कॅन्टीन येथे ‘कुतूहल अवकाशाचे’ हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण, जिज्ञासा वृत्ती आणि राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.

याचाच एक भाग म्हणून या वर्षी तालुक्यातील पाच ठिकाणी दोन टप्प्यात अवकाश दर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात कुणकेश्वर आणि चांदोशी येथे असेच कार्यक्रम पार पडले. सदर कार्यक्रमांना २१ शाळांमधून २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन टेलीस्कोपच्या माध्यमातून शुक्र, शनि, गुरु आणि चंद्र या ग्रहांचे निरीक्षण केले. त्याच बरोबर इतर तारकासमुह, नक्षत्रे, राशी, उपग्रह, दीर्घिका यांच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here