कुडाळमध्ये जागतिक खोके दिन आणि गद्दार दिन साजरा

0
187

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेसमोर आज सकाळी जागतिक खोके दिन आणि गद्दार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाविरोधात पन्नास खोके माजलेत बोके… गद्दारांचा निषेध असो… गद्दार दिनाचा निषेध असो… अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांनी गतवर्षी बंड केले. या घटनेला आज मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. या आमदारांच्या गद्दारीचा निषेध म्हणून हा दिवस जागतिक खोके दिन व गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी एकावर एक खोके ठेवून, या खोक्यांना हार घालण्यात आला तसेच ५०-५० बिस्किटचे पुडे त्यावर ठेवून अनोख्या पद्धतीने शिंदे गटाविरोधात निषेध आंदोलन छेडण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,युवासेना जिल्हाप्रमुख उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम,सचिन काळप, दिपक आंगणे, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, राजू गवंडे, अनुराग सावंत, अमित राणे, राकेश वर्दम, संतोष सावंत,नागेश करलकर, श्री. कोणकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here