काजू महोत्सवासाठी गोवा सज्ज:देविया राणे

0
43

पणजी:गोवा सरकार आणि वन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काजू महोत्सव 2024 ची सगळी तयारी पूर्ण झाली आहे.गुरुवारी आपण महोत्सवाच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.10 ते 12 मे दरम्यान 3 दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.त्यात काजू व्यसायिकांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली.

पणजीत दयानंद बांदोडकर मैदानावर आज शुक्रवार पासून 3 दिवस आयोजित कार्यक्रमात स्थानिकां बरोबर पर्यटकांना सांस्कृतिक कार्यक्रमां बरोबर काजूवर आधारीत विविध पदार्थ आणि पेयांचा आस्वाद घेता येणार आहे.

काजू महोत्सवात सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.कला अकादमी मध्ये दिवस भर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.सायंकाळी 4.30 वाजल्या नंतर नामवंत कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

याशिवाय दर दिवशी विविध स्पर्धा ,फॅशन शो,काजू गॅलरी मध्ये वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.त्याशिवाय पारंपरिक काजू प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकां पासून ते काजूवर आधारीत विविध स्वादिष्ट पदार्थ चाखण्यासाठी 50 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी काजू महोत्सव दरवर्षी साजरा केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे यंदा देखील मोठ्या दिमाखात काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ.देविया राणे यांनी दिली.काजू हे गोव्यातील प्रमुख पिक असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून राणे म्हणाल्या,वन विकास महामंडळाने अनेक ठिकाणी काजूची लागवड केली आहे.त्यात सतत वाढ व्हावी यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.

काजू पिकाला चांगला दर मिळवा तसेच आधारभूत किंमत मिळावी यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असतील असे सांगून देविया राणे म्हणाल्या,काजू पासून तयार होणारी सगळी उत्पादने एकाच ठिकाणी मिळावी आणि काजू उत्पादक,व्यसायिक यांना व्यासपीठ मिळावे यासाठी काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राणे म्हणाल्या,काजू महोत्सवात आकर्षक कार्यक्रमांसह राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्या बरोबर स्थानिक व्यवसायांना प्रामुख्याने ग्रामीण भागा मधील महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहाय्य गटांना अधिक सक्षम करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here