सिंधुदुर्ग – कळसुली ग्रामपंचायतीच्या प्रभाग 4 मधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे चंद्रशेखर चव्हाण यांनी भाजपचे प्रसाद कानडे तर महाविकास आघाडीच्या प्रगती भोगले यांनी भाजपच्या राधिका वारंग यांचा पराभव केला.
कळसुली प्रभाग 4 मधील दोन जागांसाठी काल मतदान झाले आज तहसीलदार कार्यालय येथे येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली यामध्ये चंद्रशेखर चव्हाण यांना 220 तर प्रसाद कानडे यांना 187 मते नोटा- 5 एकूण मते 412 तर प्रगती भोसले यांना 213 राधिका वारंग 175, नोटा 11 एकूण मते 399 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गायत्री तेली यांनी काम पाहिले.
निकालानंतर तहसीलदार कार्यालयाबाहेर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, यांनी पुष्पहार घालून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी कल्पेश सुद्रिक दळवी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले प्रमुख, शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, राजू राठोड, राजू शेट्ये, संतोष मुरकर, मंगेश सावंत, सुदेश वारंग गणेश चव्हाण, लीलाधर लाड, जी जी राणे, महेंद्र शिर्के, हरी काणेकर, आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.