26.5 C
Panjim
Tuesday, July 5, 2022

कणकवली शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवली नागरिक व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगावी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे आवाहन

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – कणकवली शहरात ऐन गणेशचतुर्थीच्या रात्रीच दुकाने फोडून रोकड रक्कम चोरांनी लंपास केली होती. फोडलेली दुकाने ही रस्त्यालगतची होती. हे चोरटे परजिल्ह्यातील असण्याची शक्यता असून सध्या गणेशचतुर्थीनिमित्त राहते घर व्यवस्थित मजबूत कुलूपबंद करून मौल्यवान ऐवज बंद घरात न ठेवता सुरक्षित ठेवावेत असे आवाहन कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.

कणकवली शहर व लगतच्या परिसरात नोकरी धंद्यानिमित्त राहणारे नागरिक सध्या गणेशोत्सवानिमित्त आपापल्या मूळ गावी गेले आहेत. मात्र गणेश चतुर्थी काळात आपण राहते घर आणि आपली व्यापारी आस्थापना व्यवस्थित मजबुत कुलूपबंद करावीत.

तसेच कुठलाही मौल्यवान ऐवज आपल्या बंद घरात ठेवू नका. आपल्या शेजाऱ्यांना आपले घर बंद असताना शक्यतो कल्पना द्या असे आवाहन कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.कणकवली शहरात गणेशचतुर्थी दिवशी झालेली दुकानफोडीची मोडस ऑपरेंडी ही परजिल्ह्यातील चोरांची असल्याचे दिसून येत आहे.

सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून चोरांचा माग पोलीस घेत आहेत. परजिल्ह्यातील अशी चोरी करणारे हिस्ट्रीसीटर असल्यास त्याचाही तपास केला जात आहे. कणकवली शहरात यापूर्वी रात्री पोलिसांची एक गाडी गस्त घालत असे. मात्र सध्या एक पॉईंट वाढविण्यात आला असून रात्रीच्या वेळी पोलिसांच्या दोन गाड्या शहरात आणि तालुक्यात गस्त घालत आहेत.

कोणी संशयित आढळल्यास कणकवली पोलीस ठाणे 02367-232033 येथे संपर्क साधावा. आपले राहते घर अथवा दुकान बंद करून जात असताना नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img