कणकवली शहरात पोलिसांचे संचलन, जिल्ह्यात पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना

0
100

सिंधुदुर्ग – जनआशीर्वाद यात्रा, राज्यात शिवसेना विरुद्ध राणे भडकलेला वाद व यामुळे निर्माण झालेली वादाची स्थिती या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात आज गुरुवार सकाळपासून पोलिसांनी संचलन केले.

कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीने कणकवली पोलिसांनी शहरासह परिसरात संचलन सुरू केले. कणकवली पोलिस स्टेशन ते रेल्वे स्टेशनकडून हळवल फाटा मार्गे जानवली व परत पोलीस स्टेशन असे संचलन करण्यात येत आहे.

डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, सागर खंडागळे, उप निरीक्षक अनमोल रावराणे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक या पोलीस संचलनात सहभागी झाले आहे.

राजकीय वातावरण तप्त झालेले असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने हे संचलन करण्यात येत असल्याची माहिती कणकवलीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here