कणकवलीत गॅरेजला आग लागून मोठे नुकसान

0
52

 

सिंधुदुर्ग – कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरवडे रोड येथे साबिया गॅरेज भीषण आग लागली असून या आगीची झळ बाजुला असलेल्या अन्य एका हॉटेल सदगुरु यालाही बसली. तर घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 वा. सुमारास घडली आहे. आग लागल्याची माहिती कळताच कणकवली न. पं.च्या अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली

साबिया ऑटो गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने कोणी शेकोटी सदृश्य पेटवली असावी! त्याचीच झळ लागून सदर आग साबिया गॅरेजला लागली असावी! असा अंदाज उपस्थितांकडून वर्तवण्यात येत असून यावेळी त्या गॅरेजमधे ज्वलनशील ऑईल सह इतर सामाणासह क्रैब मधील गाड्या आदी भीषण आगीत जळून खाक झाले. त्यानंतर लगतच असलेल्या हॉटेल सदगुरू’ला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील सामाण बाहेर काढले. तर बाजुलाच एका लाईन मधे अन्य २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटणा टळली, तर आगीची माहीती मिळाताच कणकवली अग्निशमक दलाचा बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here