29 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

ऐन डिसेंबरात सिंधुदुर्गात पावसाची संततधार मच्छिमारांना चोवीस तासांसाठी रेड अलर्ट’; आंबा काजू बागायतदार चिंतेत

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग : डिसेंबर महिना चालू झाला तरी पावसाची संततधार अजूनही कायमच आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून आपला जोर वाढवत नेला आणि पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले.

संपूर्ण जिल्ह्यात पावसाच्या धारा अजूनही कोसळत असून वातावरणात गारठा भरून राहिला आहे. या अवकाळी पडणाऱ्या पावसाने शेतीची कामेही ठप्प झाली आहेत.

ऐन भातकापणीच्या वेळीही पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सोसावी लागली. त्यानंतर काही दिवस आभाळ मोकळे दिसत असल्याने पाऊस गेला, असे वाटत होते.

परंतु गेले दोन दिवस पावसाने पुन्हा डोके वर काढले आणि शेतकऱ्यांसोबत सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. गेले आठ दिवस मासेमारीसाठी समाधानकारक स्थिती असताना पावसामुळे जिल्ह्यातील मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.

मच्छीमारांना येत्या चोवीस तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार असल्याने आंबा काजू बागायतदारही धास्तावले आहेत. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जुलैचा पाऊस पडत असल्याचा भास होत आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img