एमबीए एच आर झालेल्या तरुणाने केली झेंडू फुलांची लागवड..

0
451

सिंधुदुर्ग : कोकणातल्या लाल मातीत अनेक प्रकारच्या लागवडी करून आर्थिक दृट्या सक्षम इथला शेतकरी बनू शकतो.तसं नवं नवीन शेतील प्रयोग समोर येऊ लागले आहेत.मात्र कोकणात भात पिकं प्रमुख उत्पनाचे साधन असलं तरी वेगवेगळ्या प्रकारच्या शेती देखील होऊ शकतं.तसेच कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणाकडे वाटचाल करू शकतो.

तळकोकणातल्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली या गावातील तरुण गुलजार काझी यांनी आपल्या मूळ गावी दीड एकर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड यशस्वीरित्या केली आहे. एवढचं नाहीतर गुलजार काझी हे वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळे लागवडीचे प्रयोग दरवर्षी करत असतात. गुलजार काझी यांचे शिक्षण एमबीए एच आर झाले असून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी देखील केली आहे. 2009 ते 2010 मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झाल.मात्र गुलजार काझी यांनी मेट्रो सिटीमध्ये नोकरी न करता मूळ गावाला पसंती दिली.त्यांना शेतीची आवड पूर्वीपासूनचं असल्याचं स्वतः सांगतायत. गुलजार काझी हे गेले 10 ते 12 वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग शेतीच्या लागवडीच्या माध्यमातून करत असतात. यामध्ये सुद्धा त्यांचा एक हेतू होता की गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. जी गावातील लोक आहेत ती लोक मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण,नोकरी करतात आणि त्यामुळे गावातील शाळा ,वस्ती वस पडत चाललेल्या आहेत. त्यांना कशाप्रकारे गावाकडे वळवता येईल या दृष्टीने आम्ही नवनवीन प्रयोग करत असतो. तिथवली गावांमध्ये 25 हजार झेंडू फुलांची लागवड केलेली आहे.तर मी स्वतः दीड एकर क्षेत्रावर झेंडू फुलांची लागवड केली आहे.या दीड एकर क्षेत्रामध्ये 10 हजार झेंडू फुलांची लागवड केलेली आहे. त्यामध्ये दोन प्रकारची झेंडू फुले आहेत.त्यामध्ये ऑरेंज आणि पिवळ्या प्रकारची झेंडू फुले आहेत.या दोन प्रकारच्या झेंडू फुले जास्त प्रमाणात पाऊस पडणाऱ्या परदेशात होतात. या झेंडू फुलांना पावसाचा धोका नसतो.या झेंडू फुलांमध्ये पाणी रहात नाही.त्यामुळे ही झेंडू फुले जास्त काळ टिकून राहतात.या झेंडू फुलांवर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी केलेली नाही.या संपुर्ण प्लॉटला सेंद्रिय स्टेटमेंट दिलेली आहे. बाजारातील झेंडू फुलांवरती अनेक प्रकारच्या फवारणी केल्या जातात. त्यामुळे त्या बाजारामध्ये जास्त काळ टिकत नाहीत.आमचं हे झेंडू फुल 7 ते 8 दिवस राहू शकत.

झेंडू फुलांची लागवड करण्याआधी संपूर्ण दीड एकर क्षेत्र नांगरून घेतलं त्यानंतर सरी पाडून वेगवेगळे गादीवाफे तयार करण्यात आले. त्यानंतरच या गादी वाफामध्ये झेंडूच्या रोपांची लागवड करण्यात आली.या दीड एकर क्षेत्रामध्ये दहा हजार झेंडू फुलांची आम्ही लागवड केली आहे. या दीड एकर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड करताना आम्ही बाहेरच्या मार्केटची विचार न करता आम्ही लोकल मार्केटचा विचार करून झेंडू फुलांची लागवड केली होती. ही झेंडू फुलांची लागवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून केली होती.झेंडू फुलांची उत्पादन हे 60 दिवसांमध्ये सुरू होतं. येणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावरच आम्ही या झेंडू फुलांची तोड करता येणार आहे. अशा हिशोबानेच ही लागवड आम्ही केली होती. या दसऱ्यामध्ये आम्हाला उत्पन्न दोन टना पेक्षा जास्त अपेक्षित आहे. लोकल मार्केटमध्ये 80 ते 100 रुपये या दराने विक्री झाली तर निवळ नफा 2 लाख रुपये एवढा मिळणार आहे. आणि जर देवाळी या काळामध्ये सुद्धा 60-70 रुपयाचा दर मिळाला तर आम्हाला तो बोनस ठरेल. या झेंडू लागवडीसाठी सुरुवातीला 50 ते 60 हजार रुपये खर्च आला होता. त्यामुळे हा खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपये निवड नफा अपेक्षित असल्याचं गुलजार काझी सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here