24 C
Panjim
Monday, January 17, 2022

आरोग्य कर्मचाऱ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू

Latest Hub Encounter

सिंधुदुर्ग – कोरोना महमारीच्या कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची शासनाने अचानक सेवा समाप्त करून कोरोना योध्यांना धक्का दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा सेवेत घ्यावे. या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प. समोर ठीय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन कोव्हीड सेंटर उभारण्यात आली. सदर कोव्हीड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचा-यांना कोव्हीड योध्या म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती.

या कालावधीत कोरोना योध्दा म्हणुन कोरोनाची भिती न बाळगता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७२ कर्मचा-यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, सर्व्हट, डाटा इंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, फार्माशिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते.

परंतु कोरोना काळात काम करुन देखील कोणतीही पूर्व सुचना न देता ३१ ऑगस्ट २०२१ पासुन शासनाकडून सेवा समाप्त केल्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्याने या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना काळात काम केल्याने कायमस्वरूपी सेवेत सामाउन घ्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीसाठी आज पुन्हा जिल्हा परिषद समोर ठीय्या आंदोलन केले.

यामध्ये अमित वजराटकर, प्राजक्ता माळवदे, सुमेंधा गावकर, रेश्मा नायर हार्दिक कदम, सुमन सावंत यांच्यासह मोठ्या संखेने आरोग्य कर्मचारी (कोरोना योद्धा) सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -