आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत केली सफाई

0
107

 

सिंधुदुर्ग – आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कांकवलीब गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत सफाई करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, लीगल सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप वंजारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून “सत्य व अहिंसेच्या” मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मानवी आयुष्यात शारीरिक आरोग्य आणि निरोगी वातावरणासाठी “स्वच्छता” सर्वात महत्वाची आहे, असे महात्मा गांधी यांचे स्पष्ट मत होते. म्हणून त्यांनी “स्वच्छता” हा गांधीवादी जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग बनवला. सर्वांसाठी “संपूर्ण स्वच्छता” हे राष्ट्रपित्याचे स्वप्न होते. याच विचारांच्या दिशेने जात आज ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात कणकवली गणपती साना येथे कातकरी वस्तीत स्वच्छता करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी सकाळी १० वाजता कणकवली गणपती साना येथे कातकरी वस्तीत जमलेत आणि “स्वच्छता अभियान” राबविले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले, जिल्ह्यात कातकरी बांधवांच्या अनेक समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी आगामी काळात आम आदमी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी नियोजनबद्ध रित्या काम केले जाईल याबाबतचा संकल्प आज पासून आम्ही करत असल्याचेही यावेळी म्हणाले.

यावेळी सुनील पवार, संदेश परब, बंटी पवार, आकाश पवार, महेश निकम, विष्णू पवार आदी उपस्थित होते. यावेळी आदिवासी कातकरी वस्तीत सुनील पवार यांच्या झोपडीत बसून स्थानिक प्रश्न समजून घेण्यात आले. या अभियानात पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here