आमदार वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशी मागे खासदार विनायक राऊत आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

0
137

 

सिंधुदुर्ग – आमदार वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीच्या मागे खासदार विनायक राऊत यांचा हात आहे. असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची एसीबी कडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार विनायक राऊत हे सध्या या एसीबी चौकशीच्या विरोधात जोरदार आवाज उठवताना दिसत आहेत. त्यातच आमदार नितेश राणे यांनी आरोप करून विनायक राऊत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या आदल्यात दिवशी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट शिवसेनेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्याबाबत एसीबी कडे तक्रार करणारा प्रदीप भालेकर हा खासदार विनायक राऊत यांचा हस्तक आहे. भालेकर ला वसई मध्ये विनायक राऊत यांनीच घर घेऊन दिले होते. याच भालेकरने आपल्या जुहू येथील बंगल्या बाबत तक्रार केली होती. त्यामुळे विनायक राऊत हेच उद्धव ठाकरेंची उरली सुरली सेना संपुष्टात आणत आहेत असे यावेळी नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी आपल्या चौकशी मागे राज्याच्या गृह खात्याचा दबाव असल्याचे म्हटले होते. मात्र आता नितेश राणे यांनी या चौकशीच्या अनुषंगाने खासदार विनायक राऊत यांच्यावर निषणा साधत ठाकरे शिवसेने समोर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here