28 C
Panjim
Tuesday, August 16, 2022

आंबोलीत ब्लॅक पँथरचे  दर्शन

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्या अर्थात ब्लॅक पँथरचे  दर्शन झाले. सुमारे ७ वर्षांपूर्वी याच आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले होते. सावंतवाडी शहरातील काही युवक या घाटातून कारने प्रवास करत होते. यावेळी पूर्वीचा वस येथे रस्त्याशेजारी उभा असलेला हा काळा बिबटा त्यांना दिसला. बिबट्याला गाडीची चाहुल लागताच तो दरीत उडी टाकून गायब झाला.

आंबोली परिसरात  ब्लॅक पँथरचा वावर असल्याबाबत वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनीही दुजोरा दिला. यापूर्वी वन्यप्राणी गणनेतही आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे अस्तित्व दिसून आले आहे. आंबोली व पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर असल्याचे  पुराणिक यांनी सांगितले. या जातीचा बिबट्या प्रामुख्याने घनदाट जंगलात वावरतो. खुल्या परिसरात तो क्वचितच येतो, शिवाय त्याचा काळा रंग वनराईशी मिळता-जुळता असल्याने त्याचे अस्तित्व पटकन जाणवत नाही. यामुळे ब्लॅक पँथर शक्यतो माणसाच्या दृष्टीपथास पडत नसल्याचे पुराणिक यांनी सांगितले. आंबोली घाट परिसर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, वृक्ष, कीटक, औषधी वनस्पतीसाठी जगप्रसिद्ध आहे. आता या समृद्ध जंगलात ब्लॅक पँथरचे अस्तित्व सिद्ध झाल्याने आंबोलीची निसर्ग संपदा  आणखी श्रीमंत बनली आहे.

आंबोली, तिलारी व पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर आहे. काळा बिबट्या ही वेगळी जात नसून मार्जार कुळातील बिबट्याचाच हा प्रकार आहे. कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात. वाघांमध्ये पांढरा वाघ जसा दुर्मिळ, तसाच बिबट्यात काळा बिबट्याही दुर्मिळ आहे. त्याच्या कातडीचा रंग त्वचेतील “मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास कातडी काळी किंवा गडद रंगाची होते.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img