24 C
Panjim
Wednesday, December 1, 2021

अनिल परबांच्या घरात एसटी कामगार घुसणारच ही सुरुवात आहे – आमदार नितेश राणे यांच्यापेक्षा ही टोकाची भूमिका घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही

Latest Hub Encounter

सिंधुदुर्ग – अनिल परब यांच्या घरावर शाईफेक ही तर सुरवात आहे. यापेक्षा ही टोकाची भूमिका एसटी कामगार घेणार आहेत.तो निर्लज्ज माणूस आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट त्यांना घेतली नाही.नुसती शाई का? यांच्यापेक्षा ही टोकाची भूमिका घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्यांनी कामगारांची घरे उध्वस्त केली आहेत त्यांच्या घरात कामगार घुसणारच. त्यांनी हे सहन कराव असे आमदार नितेश राणे म्हणाले.

याच्यापेक्षा ही टोकाची भूमिका घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही

कणकवलीत पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाण साधला. हाकेच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट त्यांना घेतली नाही.नुसती शाई का? याच्यापेक्षा ही टोकाची भूमिका घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही. असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची घरी उध्वस्त केली आहेत त्यामुळे त्यांचा उद्रेक होणारच असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.

मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर नेमकं काय घडलं

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हा रस्त्यावर झोपून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांनी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -