28 C
Panjim
Tuesday, March 21, 2023

अधिवेशनात सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 968 कोटींची पुरवणी मागणी मंजूर खासदार विनायक राऊत यांनी दिली माहिती

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – वैद्यकीय महाविद्यालयासाठी आजच्या विधानसभा अधिवेशनात वित्त विभागाने मांडलेली 968 कोटीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता कोणत्याही अडचणी नाहीत. महाविद्यालयाचे काम जलदगतीने होणार आहे, यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिल याच्याकडुन लवकरात लवकर तपासणी होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच तपासण्या पूर्ण करू, असा आत्मविश्वास शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी जिल्ह्यामध्ये कमतरता असलेले डॉक्टर मिळणे आवश्यक आहे. बाहेरील डॉक्टर जिल्ह्यामध्ये येत नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाल्यास स्थानिक डॉक्टर निर्माण होतील व ते जिल्ह्यामध्ये आपली सेवा देतील, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मागणी करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले. सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. त्या विनंतीची मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. ते महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे, यासाठी खा. राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. या महाविद्यालयाला बजेट मध्ये 968 कोटी रूपये निधीची तरतुद केली असून पदांनाही मंजुरी दिली आहे. आता एनएमसीची टीम तपासणीसाठी येणार आहे. ती टिम येवून गेल्यानंतर खर्‍या अर्थाने महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती मिळेल आणि येणार्‍या शैक्षणिक वर्षात मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळेल. त्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles