कोकणातील शेतकऱ्यांच्या धान लागवड क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक मदत करणार- ना. अजित पवार भात खरेदी बोनसबाबत आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात वेधले लक्ष

0
158

 

भात खरेदी बोनसबाबत आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले असता त्यावर उत्तर देताना वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले की, बोनस स्वरूपात दिली जाणारी रक्कम ही शेतकऱ्याला मिळण्या ऐवजी भात खरेदी प्रक्रियेतील दलालांनाचा मिळत आहे. या लाभापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्यामुळे यावर्षीपासून भात खरेदी बोनस ऐवजी शेतकऱ्यांच्या धान लागवड क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे अशी माहिती ना. अजित पवार यांनी दिली आहे.

 

सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत विधानसभा अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम जाहीर करण्याची मागणी त्यांनी ना. अजित पवार यांच्याकडे केली.
त्यावर सविस्तर माहिती देताना ना.अजित पवार म्हणाले की, भात खरेदी नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून बोनस स्वरूपात दिली जाणारी रक्कम ही शेतकऱ्याला मिळण्या ऐवजी भात खरेदी प्रक्रियेतील दलालांनाचा मिळत आहे. शेतकऱ्यांना ती रक्कम मिळत नाही.शेतकऱ्यांच्या नावाखाली मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्याच हातामध्ये जावी हा मुख्य उद्देश असून यावर्षीपासून भात खरेदी बोनस ऐवजी शेतकऱ्यांना दुसरा लाभ मिळवून दिला जाणार आहे. शेतकरी जेवढया क्षेत्रात धान पिकवतात तेवढ्या क्षेत्राच्या प्रमाणात पर एकर प्रमाणे आर्थिक मदत करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे.असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या भाताची खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्चित करून यावर्षी देखील उच्चांकी भात खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर मिळवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकाला गेल्या दोन वर्षात अधिकचा दर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here