30 C
Panjim
Monday, May 16, 2022

दाऊदचा भागीदार नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी पुढे आलेले संजय राऊत देशद्रोही भाजप आमदार नितेश राणे यांची टीका

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दाऊदचा भागीदार असलेल्या नवाब मलिक यांना वाचविण्यासाठी पुढे आलेले संजय राऊत हे देशद्रोही आहेत. असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सात तास चौकशी केल्यानंतर इडीने बुधवारी अटक केली. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.

9 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा खळबळजनक खुलासा केला होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले होते. या जमिनी मुंबई बाॅंम्ब स्फोटाच्या आरोपींच्या मालकीच्या आहेत. सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेल यांचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप फडणविसांनी केला होता. या दोघांनी मुंबईतील एलबीएस रोडवरील कोट्यावधींची जमीन मलिक यांच्या नातेवाईकाच्या एका कंपनीला विकल्याचे म्हणले होते.

या पार्श्‍वभूमीवर मालिकांना अटक झाली असताना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, जनाब संजय राऊत आपण सत्तेच्या लाचारी मध्ये 1993 मध्ये झालेला बॉम्बस्पोट कदाचित विसरला असाल. या बॉम्बस्फोटांमध्ये 257 मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते. आणि 713 मुंबईकर हे जखमी झाले होते. या प्रकरणांमध्ये सूत्रधार म्हणून दाऊद इब्राहिम याचे नाव पुढे आले होते. यावेळीसुद्धा आपलेच काँग्रेस सरकार होते. याच देशद्रोही दाऊदचा भागीदार म्हणून नवाब मलिक यांचे नाव पुढे आले आहे. या सगळ्याचा आपण निषेध करायला हवा होता. मात्र नवाब मलिक यांना वाचविण्यासाठी आपण पुढे आलेले आहात. हा देखील देशद्रोहच आहे. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img