“इंडियाज इंदिरा” फोटो प्रदर्शनाचे पी चिदंबरम यांच्या हस्ते उद्घाटन

0
89

पणजी: माजी पंतप्रधान, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसने पणजीत आयोजीतकेले आहे. त्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

इंदिरा गांधी यांच्या 104 व्या जयंती निमित्त या असंख्य दुर्मिळ छायाचित्रांचे हे फोटो प्रदर्शन 29 नोव्हेंबर पर्यंत धेंपो हाऊस समोर चालणार आहे.

 

 

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री. गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष श्री आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स , युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, उदय मडकईकर, टोनी रॉड्रिगीस, सुरेंद्र फुर्तादो, महिला अध्यक्ष बीना नाईक, अखिलेश यादव, रुडोल्फ फेर्नांडीस, नझीर खान, तुलियो डिसोझा, माजी मंत्री संगीता परब आणि इतर नेते उपस्थित होते.

 

या प्रदर्शनात इंदिरा गांधी यांचे बालपणातील फोटो, सार्वजनिक जीवनातील प्रवास, काँग्रेस अध्यक्ष, मंत्री आणि शेवटी पंतप्रधान होण्यापर्यंतचे फोटो आहेत.

 

भारताच्या कल्याणासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर केलेले कार्य आणि कौटुंबिक जीवनही या फोटो प्रदर्शनात दर्शविले आहे.

 

 

त्यांचे वडील आणि भारताचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू आणि मुलगे राजीव आणि संजय गांधी यांच्या बरोबरही त्यांचे फोटो आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here