सॅटेलाईट टॅगींग केलेली कासवे लक्षद्वीप समुद्रात

0
371

कोकण – कासव संवर्धन मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यात सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कासवांपैकी बागेश्री हे कासव आता पूर्वेकडे श्रीलंकेकडे जात आहे. ते आता कोलंबोपासून सुमारे १५० किमी अंतरावर आहे. तर गुहा हे कासव गेल्या दहा दिवसांत सुमारे २५० किमी दक्षिणेकडे सरकले आहे. आता ते लक्षद्वीपमधील कदमत बेटापासून २५ किमी दूर आहे.

मॅंग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या रत्नागिरी विभागाच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आणखी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रहाद्वारे टॅग करण्यात आले. दोन्ही मादी असलेल्या या कासवांना बागेश्री आणि गुहा अशी नावे देण्यात आली आहेत.

हा प्रकल्प कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्‍यासाठी आणि घरटे बनवण्‍याच्‍या ठिकाणी जाण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या प्रवासाचा मागोवा घेण्‍यासाठी केलेल्या संशोधन कार्यक्रमाचा भाग आहे. गेल्या वर्षी पाच मादी कासवांना जोडलेले ट्रान्समीटर गहाळ झाले, यामुळे मॅंग्रोव्ह फाउंडेशन आणि डब्ल्यू आय आय ने यंदा या दोन कासवांना सॅटेलाइट टॅग केले आहे.

सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कासवांपैकी बागेश्री हे कासव केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे वळले आहे. ते कासव तिथल्या महाद्वीपीय शेल्फ पाण्यात गेली आहे. आणी ते आता श्रीलेंकेच्या दिशेने जात आहे. बागेश्री सातत्याने मार्गक्रमण करत आहे. तर दुसरे कासव गुहा आता हळूहळू मार्गक्रमण करताना दिसत आहे. अरबी समुद्र मागे सोडून लक्षद्वीप समुद्रात प्रवेश करत आहे. तिचा मागील महिन्यात वेग काहीसा मंदावला होता. आता ते दक्षिणेच्या दिशेने जात आहे.

विणीच्या हंगामात प्रतिवर्षी कोकण किनारपट्टीवर अंडी देण्यासाठी येणारी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे वर्षभरात कसा प्रवास करतात, ती कुठून येतात याचा या अभ्यासातून उलगडा होणार आहे. यामुळे या प्रकल्पाकडे सर्वच कासव प्रेमी आणि अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here