सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 8859 शेतकऱ्यांना कर्जमाफी

0
132

 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या व दुसऱया यादीत जिल्हय़ातील 8859 शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकूण 11063 लाभार्थ्यांची यादी निश्चित असून 2204 शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी उपनिबंधक कार्यालयाने 11063 लाभार्थी निश्चित केले होते. दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या शासनाच्या घोषणेनंतर या शेतकऱयांचे डोळे शासनाच्या यादीकडे लागले होते. दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जिल्हय़ातील केवळ 250 शेतकऱयांचा समावेश होता. तर 28 फेब्रुवारी रोजी दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

दुसरी यादी नुकतीच जाहीर झाली असून यात 8609 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत 8859 शेतकऱयांची नावे कर्जमाफी यादीत समाविष्ट झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे यांनी यांनी दिली. आधार प्रमाणिकरण आवश्यक असून आतापर्यंत 4109 शेतकऱयांची प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित 4750 शेतकऱयांची सुरू आहे. प्रमाणिकरण झालेल्यांपैकी 224 शेतकऱयांच्या बँक खाती 66 लाख 57 हजार 968 रुपये जमा करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधार प्रमाणिकरण संगणक प्रणालीत करणे आवश्यक आहे. मात्र सर्व्हरला अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. मात्र आधार प्रमाणिकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here