सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज ३३ अर्ज दाखल १९ जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात; ३१ डिसेंबरला होणार मतदान…

0
118

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी तब्बल ३३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.१९ जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत तब्बल ९१ उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत.ही निवडणूक प्रक्रिया ३० तारखेला होणार आहे.तर ३१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी ६ डिसेंबर रोजी अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे.

बँक निवडणुकीत राणे विरुद्ध सर्व पक्ष

या निवडणुकीत महा विकास आघाडी मधील सर्व पक्षांनी एकत्र येत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच पॅनल उभ केला आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत पॅनल उभ केल आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने नारायण राणे विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे.

१९ जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात

शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारी अर्ज असे मिळून ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत या अर्जांची छाननी सोमवार ६ डिसेंबर रोजी होणार असून मंगळवार ७ डिसेंबर ते मंगळवार २१ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली असून बुधवार २२ डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे ३० डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे मतदान होणार आहे तर ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

आजी माजी अध्यक्ष निवडणूक रिंगणात

यामध्ये राजन तेली, कणकवली (नागरी सहकारी बँक) राजन तेली, कणकवली (इतर कायद्याखालील संस्था) मनीष दळवी, वेंगुर्ले (सग्लन शेती), प्रकाश गवस, दोडामार्ग (संलग्न शेती), चंद्रशेखर सावंत, कुडाळ (इतर कायद्याखालील संस्था), विकास सावंत, सावंतवाडी (इतर कायद्याखाली संस्था), विकास सावंत, सावंतवाडी (इतर कायद्याखालील संस्था), चंद्रकांत नाईक, सावंतवाडी (इतर कायद्याखालील संस्था), समीर सावंत, कणकवली (इतर कायद्याखालील संस्था), प्रज्ञा ढवन, कणकवली (महिला प्रतिनिधी) निता राणे, कुडाळ (महिला प्रतिनिधी) नागेश मोरये, कणकवली (इतर मागास वर्गातील सदस्य), गणपत देसाई, दोडामार्ग (संलग्न शेती), सुभाष मडव, कुडाळ (संलग्न शेती), दत्ताराम वारंग, सावंतवाडी (संलग्न शेती), गजानन गावडे, सावंतवाडी (संलग्न शेती), अस्मिता बांदेकर, कुडाळ (महिला प्रतिनिधी) अतुल काळसेकर, कणकवली (इतर मागास वर्गीय), व्हिक्टर डांन्टस, मालवण (संलग्न शेती) विष्णू कुबल, दोडामार्ग (संलग्न शेती), सचिन देसाई, वेंगुर्ला (सलग्न शेती), नकुल पार्सेकर, सावंतवाडी (अनुसूचित जाती/जमाती), गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडी (संलग्न शेती), दिलीप पारकर, कणकवली (संलग्न नागरी सहकारी बँक) विलास गावडे, वेंगुर्ला (संलग्न शेती), विलास गावडे, वेंगुर्ले (इतर कायद्याखालील संस्था) सुरेश चौकेकर, मालवण (अनुसूचित जाती), कमलाकांत कुबल, मालवण (संलग्न सहकार शेती), अर्चना घारे, सावंतवाडी (इतर कायद्याखालील संस्था) अर्चना घारे, सावंतवाडी (महिला प्रतिनिधी) मनीष पारकर, कुडाळ (इतर मागासवर्गीय) गणेश राणे, देवगड (संलग्न शेती), प्रकाश बोर्डस, देवगड (संलग्न शेती) या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here