वर्षा पर्यटनासाठी मांगेली धबधब्यावर आलेल्या पर्यटकांना पाठवलं माघारी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांगेली धबधबा पर्यटनासाठी बंद, पोलिसांचा कडक पहारा

0
116

सिंधुदुर्ग – मांगेली फणसवाडी येथील धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी असताना देखील पर्यटक वेगवेगळ्या मार्गाने या धबधब्यावर येत आहेत. यांना रोखण्यासाठी पोलिसांचा चोख कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खोक्रल येथील शांतादुर्गा, सिध्देेश्वर मंदिराच्या बाजूला पोलिस तैनात होते. येथून आलेल्या पर्यटकांना माघारी पाठविण्यात येत होते.

 

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून मांगेली धबधबाल्या गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांची पसंती आहे. येथे हजारो पर्यटक पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येत असतात. परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे पर्यटकांना याठिकाणी येण्यास बंदी घालण्यात आली होती. या वर्षीही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ग्राम सनियंत्रण समितीने वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांनी धबधब्या जवळ येऊ नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी बॅनर लावूनही पर्यटन स्थळ ठिकाणी येण्यास बंदी असल्याचे जाहिर केले आहे. तरी देखील आडमार्गाने काही पर्यटक धबधबा पर्यत पोहोचत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. ही बाब गावचे सरपंच विश्वनाथ गवस यांनी पोलिस निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देत लेखी निवेदन दिले होते. यानुसार रविवारी खोक्रल मंदीर आणि धबधबा परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता. असे असताना देखील काही पर्यटक येथे आले होते. त्यांना तंबी देत माघारी पाठविण्यात आले. खोक्रल येथील मंदीर जवळ सरपंच देवेंद्र शेटकर, पोलिस पाटील विलास शेटकर, तर मांगेली धबधबा परीसरात सरपंच गवस पोलिसांसमवेत उपस्थित राहून सहकार्य करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here