रत्नागिरी जिल्ह्यात आज मंगळवारी दापोली येथे 2 आणि संगमेश्वर येथे 2 रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसात नवीन 9 रुग्णांची भर पडली आहे. आता रुग्णाची संख्या एकूण 15 झाली आहे.
आज नव्याने सापडलेले रुग्ण हे मुंबईतुन येणारे आहेत. चाकरमान्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. चाकरमान्यांना जिल्हयात आणण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाने चूक केल्याच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
यातील 2 रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील मोर्डवे येथील सुन सासु तसेच 2 दापोलीतील पंचनदी ,ओणवशी, वाघवावडीतील आहेत. हे सर्व कोरोनाग्रस्त मुंबई रिटर्न क्वारंटाईन असलेले रुग्ण आहेत.