मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर, १७ रोजी आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन : १८ रोजी किल्ले सिंधुदुर्ग भेट : चिपी विमानतळ पाहणी : तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याच्या विकास कामांचा घेणार आढावा

0
128

 

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. १७ व १८ फेब्रुवारी या दोन दिवसीय दौऱ्यात आंगणेवाडी यात्रोत्सवात भराडी मातेचे दर्शन, किल्ले सिंधुदुर्ग भेट, चिपी विमानतळ पाहणी, याबरोबरच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या तीनही जिल्ह्याच्या विकासाची आढावा बैठक घेतली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम मालवण तारकर्लीत असणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

सोमवारी १७ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता आंगणेवाडी यात्रोत्सवात श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मालवण तारकर्ली येथील एमटीडीसी स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे सिंधुदुर्गसह कोकणातील विकासकामांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने घेतली जाणार आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उदोग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अदिती तटकरे हेही मंत्री तसेच अव्वल सचिव, उच्चस्तरीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.

किल्ले सिंधुदुर्ग भेट : चिपी विमानतळ पाहणी

मंगळवार १८ फेब्रुवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री ठाकरे किल्ले सिंधुदुर्गला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक, दुपारी १ वाजता रायगड जिल्ह्यातील विकासमाबाबत आढावा बैठक, त्यानंतर दुपारी ३ वाजता चिपी विमानतळाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. एकूणच या दोन दिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत आमदार, खासदार व लोकप्रतिनिधिंची यांची उपस्थित असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here