भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस गोवा दौऱ्यावर

0
105

पणजी:भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू केली असून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस डी. पुरंदेश्वरी आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर दाखल झाल्या.

त्यांनी आल्या आल्या पक्षाच्या विविध पातळीवरील बैठका घेणे सुरू केले आहे. उद्याही त्या अनेक बैठका घेणार आहेत.
विधानसभेची येती निवडणूक स्वबळावर लढून पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी यांच्या आदेशानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.
डी. पुरंदेश्वरी यांचे विमानतळावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनसचिव सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस अॅड नरेंद्र सावईकर आदींनी स्वागत केले. विमानतळावरुन त्या पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना शुभेच्छा देण्यासाठी पोचल्या. तेथे महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन त्यांनी केले. मंत्री मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत मुरगाव मंडळ समितीची आणि त्यानंतर वास्को मतदारसंघातील मतदान केंद्र ८ ची बैठक आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या उपस्थितीत त्यांनी घेतली. येत्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला.
पणजीतील भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक घेत विधानसभेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. भाजयुमोच्या प्रदेश समितीशी त्यांनी संवाद साधला. सायंकाळी उशिरा त्यांनी म्हापसा येथे भाजपाच्या उत्तर गोवा समितीची बैठक घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here