फलोत्पादन योजनेतून रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी आता स्थानिकांचीच शरद पवार यांचा सल्ला; जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी महाविकास आघाडीचे नेहमीच सहकार्य…

0
173

 

सिंधुदुर्ग – सिंधुदूर्गात राबविण्यात आलेली फलोत्पादन योजना आपल्या संकल्पनेतून तयार झाली आहे.त्यासाठी आवश्यक निधी दिला,मात्र त्यात सातत्य राहण्यासाठी स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनीधींनी प्रयत्न करावेत,असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.दरम्यान जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होत आहे.पंचतारांकीत हॉटेल उभी राहत असल्यामुळे आता त्याचा फायदा होणार आहे.त्यामुळे या ठीकाणी पर्यटनवाढीसाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्कीच करू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोवा येथून कोल्हापुरच्या दिशेने जाणारे श्री.पवार काही काळ आंबोली येथे थांबले.यावेळी त्या ठीकाणी उपस्थित पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले असता त्यांनी ही माहीती दिली.यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस,तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी,चित्रा बाबर-देसाई,हीदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here