नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीला सुरूवात

0
120

सिंधुदुर्ग – सतिश सावंत यांचे समर्थक संतोष परब हल्लाप्रकरणात आ. नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणीला सुरुवात झाली असून राणेंच्या बाजूनं वकिलांची फौज कोर्टात लढत देणार आहे.

 

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झालीय. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे.

 

फिर्यादी संतोष पवार हे देखील जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here