कांदा आयात थांबवावी-राजू शेट्टी

0
141

 

कांद्याच्या भाववाढीवर सरकारकडून नियंत्रण आणण्यासाठी आणि कांद्याचा पुरवठा होण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे. या कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा जोरदार विरोध दर्शविला आहे. मोदी सरकारचा हा आत्मघातकी निर्णय आहे, अशी जोरदार टीका शेट्टी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

कांद्याचे दर वाढून 2 महिने झाले आहेत मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला? असा सवाल उपस्थित करत सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

तुर्कस्तानमधून 11 हजार टन कांदा आयात केल्यानंतर बाजारपेठेत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळतील, अशी भिती शेट्टी यांनी बोलून दाखवली आहे. तुर्कस्तानातून कांदा आयात केल्यानं कांद्याचे भाव प्रचंड गडगडतील. आता कुठे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा चांगला पैसा मिळत होता. त्याचवेळी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे शेतकऱ्यांच्या यामध्ये प्रचंड तोटा होणार आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, कांदा दरवाढीचे पडसाद आज राजधानी नवी दिल्लीत देखील उमटलेले पाहायला मिळाले. काँग्रेसच्या खासदारांनी आज सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here