कणकवली हादरली, अज्ञाताने ३ दुचाकी जाळल्या एक दुचाकी वाचविण्यात यश

0
115

 

सिंधुदुर्ग – कणकवली शहरातील रवळनाथ मंदिरानजीक संजय ढेकणे यांच्या घरा जवळ रस्त्यालगत उभ्या केलेल्या ३ दुचाकींना बुधवार ९ डिसेंबर रोजी पहाटे ३ च्या दरम्यान आग लावल्याची घटना घडली. यात २ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. तर एक दुचाकी स्थनिकांच्या प्रसंगसावधानातून वाचवण्यात यश आले आहे.

कणकवली शहरात राहणाऱ्या कळसुली हायस्कुलचेचे शिक्षक अमर पवार यांची डिस्कव्हर मोटरसायकल, मोहिते यांची प्लेझर,पाताडे यांची यामाहा पसिनो अशा दुचाकी ढेकणे घरा जवळ उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या दुचाकींना आग लागली आहे. दरम्यान हि लागली की लावली गेली या बाबत उलट सुलट चर्चा होत आहे. करण गाड्या उभ्या असलेल्या घरा समोरील श्री. निमनकर यांच्या घराला बाहेरून कडी घालण्यात अली होती. त्यामुळे गाड्याना आग लावतेवेळी कोणी बाहेर येऊन आपला प्लॅन फसू नये या उद्देशाने कडी लावली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शहरातील मधलीवाडी रवळनाथ मंदिरानजीक नागवे रोड लगत ग्रामस्थ आपले वाहने उभी करूनठेवतात. येथील एकाने घरापर्यंत जाणारी वाट बंद केली असल्यामुळे नाईलाजाने गाड्या येथील लोक रस्त्यालगत उभ्या करतात. दरम्यान गाड्यांना लागलेली आग पाहून संजय ढेकणे यांना जाग आली. त्यांनी अन्य लोकांना जागे करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. संजय ढेकणे यांनी डिस्कव्हर मोटरसायकल बाजूला केली. त्यामुळे ती वाचली आहे. मात्र अन्य दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस पहाटेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत पाहणी करून पंचनामा केला आहे.

कणकवलीत यापूर्वी घडल्या आहेत घटना

कणकवली शहरात यापूर्वीही पूर्व वैमनस्यातून दुचाकी आणि वाहनांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आजच्या अग्नी तांडवाने कणकवलीकर पुन्हा एकदा हादरले आहेत. मात्र हि आग लागली कि लावली गेली याचा कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here