27 C
Panjim
Wednesday, August 17, 2022

२७ मे रोजी पणजीत ‘मराठी आठव दिवस’ शंकर रामाणींवरील परिसंवाद व कविसंमेलन

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

पणजी : २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जागतिक मराठी दिन म्हणून साजरा होतो. त्याचे स्मरण वर्षभर राहावे यासाठी मुंबईच्या स्वामीराज प्रकाशनतर्फे दर महिन्याच्या २७ तारखेला वेगवेगळ्या भागांमध्ये ‘मराठी आठव दिवस’ साजरा केला जातो. गेल्या २७ मार्च रोजी कोल्हापूर येथे, तर २७ एप्रिल रोजी कणकवली येथे ‘मराठी आठव दिवस’ साजरा झाला होता. याच मालिकेतील तिसरा ‘मराठी आठव दिवस’ येत्या दि. २७ मे रोजी गोव्यात पणजीत साजरा होणार आहे.

 

स्वामीराज प्रकाशन आणि गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात गोमंतकीय कविवर्य शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त *निःशब्दाच्या पैल’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर, कवयित्री व शंकर रामाणी यांच्या समग्र कवितेच्या संपादक डॉ. अनुजा जोशी व दैनिक नवप्रभाचे संपादक तसेच शंकर रामाणी यांच्या “एकट्याचे गाणे’ या पत्रसंग्रहाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा सहभाग असेल.

त्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. केळुसकर असतील. या कविसंमेलनात कवयित्री राधा भावे, डॉ. अनुजा जोशी, पौर्णिमा केरकर, कवी परेश नाईक व ज्ञानेश मोघे यांचा सहभाग असेल. हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या  सभागृहात संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. मराठीप्रेमींनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका सौ. रजनी राणे तसेच गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी केले आहे.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img