हाँगकाँग क्रिकेट संघाचा पूर्व कप्तान नजीब अमर करणार सिंधुदुर्गतील विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

0
104

 

सिंधुदुर्ग – आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली-कलमठ येथे सुरू करण्यात आलेल्या विनोद कांबळी ग्रामीण क्रिकेट अकॅडमीच्या ऑनलाईन क्रिकेट प्रक्षिकानाला सुरवात करण्यात आली आहे.शनिवारी ४ जुलै रोजी भारतीय वेळे नुसार सायंकाळी ७.३० वाजता हाँगकाँग क्रिकेट संघाचा पूर्व कप्तान आणि प्रशिक्षक नजीब अमर हे हाँगकाँग येथून मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती व्यवस्थापक ऋषी भावे यांनी दिली.

उजव्या हाताची फलंदाजी करणारा, स्लो बॉलिंग करत डाव्या हाताचा मारा करणाऱ्या या अष्टपैलू क्रिकेटपटू च्या टिप्स व्हीकेसी अकादमीच्या विद्यार्थांना महत्वपुर्ण ठरणार आहे. नजीब अमर हे एशियन क्रिकेट कॉन्सिलचे सदस्य आहेत.हाँगकाँग क्रिकेट संघाचे पूर्व कॅप्टन आणि आताचे मार्गदर्शन आहेत.यूए संघाचे ते असिस्टंट कोच आहेत.रॉबिन सिंग क्रिकेट अकादमीचे ते दुबई येथील प्रशिक्षक आहेत.त्यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाची संधी सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्यांना मिळणे ही मोठी पर्वणी मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here