स्वतःच्या बापावरच केला खुनी हल्ला, आईसह बहिणीलाही केली मारहाण

0
133

 

सिंधुदुर्ग – जन्मदात्या बापाच्याच जीवावर उठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सावंतवाडीतील सालईवाडा येथे मंगळवारी घडली. दारूच्या नशेत स्वतः च्या मुलाने हल्ला केल्याची माहिती वडिलांनी पोलिसांना दिलीय. बापासोबतच आई आणि बहिणीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत या मुलाने क्रूरतेचा कळस गाठलाय. याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सावंतवाडी सालईवाडा येथे 57 वर्षीय सुनील ताम्हाणेकर हे आपल्या कुटुंबासह राहतात. पत्नी, मुलगा, मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. सुनील ताम्हाणेकर हे कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, मुलगा हा व्यसनी असल्याने तो दारूच्या नशेत रोजच घरातल्या भांड्यांची आदळआपट करतो. योगेश असं त्याच नाव असून तो केवळ 24 वर्षांचा आहे.

मध्यरात्रीही दारूच्या नशेत त्याने बाथरूममधला बल्ब फोडला होता. याचा जाब त्याची आई सायली ताम्हाणेकर विचारलाय गेल्यावर योगेशने त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. या वादात सुनील ताम्हाणेकर पडल्याने योगेशने रागाच्या भरात त्यांच्या कमरेवर दगड मारला. सायली या योगेश यांना सोडवायला गेल्यावर आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी योगेश यांच्यावर सुरीने वार करत दुखापत करत मुलगी सुवर्णा हिलाही ठोशाने मारून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी योगेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही व्यसनाच्या आहारी जावून तो शिवीगाळ करत असल्याची कल्पना योगेश कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचमुळे हा प्रकार घडल्याच बोललं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here