स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या २७ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत मिळविले घवघवीत यश

0
103

सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या २७ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर होणार्या ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्यापैकी ८ जणांनी गोल्ड मेडल पटकाविले आहे.

स्टेपिग स्टोन ग्लोबल स्कूल हि संस्था कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षणात आघाडीवर राहीली आहे, अलिकडेच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेतही या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता, यामध्ये तब्बल २७ विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थी मनवा साळगावकर १०० गुण, सक्षम ओटवणेकर १०० गुण, गौरेश परब ९७ गुण, कमलजा चिंदरकर ९७ गुण, गौरांग परब ९६ गुण मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले.

चैत्राली पाटील ९४ गुण, निधी शिर्के ९३ गुण, ऋषील परुळेकर ९१ गुण, राॅय फर्नांडिस ९१ गुण मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केले. ऋतुजा पेडणेकर ९० गुण, महमंद पटेल ९० गुण, नहूश गावडे ८९ गुण, सरस नाईक ८६ गुण, यांनी बाॅन्झ मेडल पटकाविले. प्रत्युषा घोगळे हीनेही ८० गुण मिळवून यश मिळविले.

इयत्ता दुसरीतील विद्यार्थी स्पृहा आरोंदेकर ९९ गुण, सोहम देशमुख ९८ गुण, अस्मी प्रभुतेंडोलकर ९७ गुण मिळवून गोल्ड मेडल मिळविले. तर अस्मी सावंत ९५ गुण,तनिष्क निर्मले ९४ गुण, वीरा राऊळ ९३ गुण, वैद्यही शिरोडकर ९२ गुण, वैष्णव सावंत यांने ९१ गुण मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

रिनेल डिसोजा हीने ८८ गुण मिळवून ब्रांझ मेडल मिळविले. तर रौनक पवार ८३, तनिष्क पवार ८०, व रेहान दुर्वेश,मोजेस महाडे यांनीही यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या शिक्षिका व इतर कर्मचाऱ्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here