29 C
Panjim
Monday, December 5, 2022

सेनेने सत्ते साठी राजकीय सिद्धांत पायदळी तुडविले,भारताचे गृहमंत्री अमित शाह ची सेनेवर टीका तीन पायांचे ऑटोरिक्षा सरकार म्हणून केली टीका

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – राज्यात ऑटोरिक्षा सरकार आहे.हे सरकार सर्वच स्थरावर असफल आहे.जनादेश पायदळी तुडवून तीन पक्षांनी सरकार बनविले. बिहार मध्ये आम्ही दिलेला शब्द पाळला. मी कधी बंद रूममध्ये चर्चा करत नाही.की शब्द देत नाही बाळा साहेब यांचा प्रत्येक विचार त्यांच्याच लोकांनी वाहत्या नदीत सोडले.आणि स्वार्थासाठी, सत्ते साठी युती तोडून गेलेत.सेनेने सत्ते साठी राजकीय सिद्धांत पायदळी तुडविले.तुमच्या सारखे आम्ही चालणारे नाही तसे चाललो असतो तर आज अस्थित्व राहिले नसते.अशी टीका भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे तर गेले, पण आता शिवसेनेचे नेते राजकारणासाठी तत्वांना तोडत आहेत. ते तत्वासाठी राजकारणात आलेले नसून राजकारणासाठी तत्व तोडणारे आहेत,अशा शब्दात अमित शहा यानी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. जनादेशाचा आदर न करता आम्ही वचन तोडलं असं खोटंनाटं सांगून आम्हाला बदनाम केलं केलं आणि दगाबाजी केली. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नसून त्यांनीच जनादेशाचा अनादर केला आणि सत्तेसाठी लाचारी पत्करली अशा शब्दात शहा यांनी शिवसेनावर हल्लाबोल केला.

तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार

वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शहा म्हणत सरकारमधील तिन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नसल्याचे शहा यांनी सूचिक केले.

राणेंचा सन्मान कसा करायचा हे भाजपला चांगले माहीत आहे

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे हे असून जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

विकासकांना प्रथम विरोध आणि नंतर समर्थन करणे हा सेनेची पद्धतच -देवेंद्र फडणवीस

समृद्धी महामार्गला तेव्हा याच शिवसेने विरोध केला.मुंबई मेट्रोची सुद्धा तीच स्थिस्ती आहे.त्यामुळे आधी विरोध करायचा ही शिवसेनेची पद्धतच आहे.आज हेच विरोध करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समृद्धी महामार्ग पाहण्यासाठी दोन दोन वेळा तेथे जातात अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याठी झोप विसरून काम करणारे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे होय.सिंधुदुर्ग जिल्हात मेडिकल कॉलेज उभे करण्यासाठी अंख्य अडचणींना सामोरे गेले आहेत.त्यामुळेच ही व्यवस्था उभी राहिली.आज देशाला डॉक्टर ची मोठी गरज आहे मात्र ते घडविण्यासाठी सक्षम कॉलेज हवीत आणि राणेंच्या मेडिकल कॉलेज मुळे नक्कीच हा तुटवडा कमी होईल.
आज देशात आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून होत आहे.म्हणून कोरोना लास उपलंबद्ध झाली.महाराष्ट्र राज्यात मात्र मोठ्या प्रमाणात कोरोना फैलावला हे अपयश राज्य सरकारचे आहे.

आयत्या बिळावर नागोबा याला शिवसेना म्हणतात – नारायण राणे

हिंदुस्थानचे गृहमंत्री अमित शाह आल्याने महाराष्ट्रात आणि गोव्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकास कामांना विरोध करायचा आणि उदघाटन करण्याठी पुढे पुढे करायचे ही सेनेची नीती आहे. आयत्या बिळावर नागोबा याला शिवसेना म्हणतात. अशी टीका यावेळी नारायण राणे यांनी केली.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles