सिंधुदुर्ग जिल्ह्यात 412 व्यक्ती कॉरंटाईन, प्रशासनाने दिली माहिती

0
122

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजमितीस एकूण 412 व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्यापैकी 272 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 140 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 407 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 405 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आहा आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल येणे शिल्लक नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 37 व्यक्ती दाखल असून त्यातील 26 व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर 11 व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण 2383 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी ऑनलाईन ओपीडीची सुविधा
जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाचे esanjeevaniopd.in हे ॲप तयार करण्यात आले आहे. आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून ही वेबसाईट सुरू करता येते. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. सध्या या वेबसाईटचा लाभ जिल्ह्यातील 183 व्यक्तींनी घेतला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यातील स्थिती अशी आहे

1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 272
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 140
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 407
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 407
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 2
6 निगेटीव्ह आलेले नमुने 405
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 37
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 01
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2383

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here