सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 लाख 45 हजार 309 जणांनी घेतला पहिला डोस

0
118

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 45 हजार 309 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

एकूण 9 हजार 796 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 96 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 842 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 141 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त

60 वर्षावरील 88 हजार 359 व्यक्तींनी पहिला डोस तर 30 हजार 448 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 86 हजार 125 नागरिकांनी पहिला डोस तर 15 हजार 514 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील 51 हजार 187 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 463 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 9 हजार 971 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 98 हजार 620 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 21 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 77 हजार 140 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत.

2 लाख 35 हजार 776 कोविशिल्ड आणि 74 हजार 195कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 9 हजार 971 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 4 हजार 220 लसी उपलब्ध आहेत.

त्यापैकी 1 हजार 40 कोविशिल्डच्या आणि 3 हजार 180 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 490 लसी शिल्लक असून त्यापैकी 230 कोविशिल्ड आणि 260 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here