सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८४ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण, आत्तापर्यंत एकूण २७१ रुग्णांना डिसचार्ज

0
161

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण संख्या अजूनही वाढतीच आहे. जिल्ह्यात अजून १० कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातील दोन नर्सचाही समावेश आहे. बुधवारी मिळालेल्या या १० रुग्णांनंतर गुरुवारी यात अजुन दोन रुग्णांची भर पडली आहे. मालवण येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमधे दोन रुग्ण कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोविड १९ मधे अजुन ३ रुग्ण पॉजिटिव्ह मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण संख्या ३६१ येवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण २७१ रुग्णांना डिसचार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितित एकूण ८४ रुग्ण उपचार घेत आहेत.

आता मिळालेल्या १० रुग्णांमधे सावंतवाड़ी कारिवडे येथील ३, कुडाळ तालुक्यातील झाराप १, ओरोस २, आणि सोनवडे सरंबळ १ तर कणकवली तालुक्यातील नांदगांव येथील २ आणि कुंभवडे १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर गुरुवारी सापडलेल्या अजुन ५ रुग्णांमधे मालवण येथील रॅपिड टेस्ट मधे मिळालेले २ रुग्ण तर कणकवली शहर १, नांदगांव १ आणि सावंतवाड़ी तालुक्यातील इन्सुली १ अश्या रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने १९१ कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या ६ हजार ५१ येवढी झाली आहे. यातील ५ हजार ९१७ नमूने प्राप्त झाले आहेत. अजुन १३४ नमूने अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील ५ हजार ५५९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंन्त एकूण ३६१ अहवाल बाधित आले आहेत. बाधित पैकी २७१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सहा व्यक्तिचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात सद्यस्थितित एकूण ८४ रुग्ण सक्रिय राहिले आहेत.

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात ३७ कोरोना बाधित आणि ४५ कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २३ कोरोना बाधित तर १ कोरोना संशयित उपचार घेत आहे. तर कोविड केअर सेंटरमध्ये १४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर ४ कोरोना बाधित होम क्वारंटाइन आहेत. अजुन ३ जिल्ह्या बाहेरील रुग्णांचा समवेश आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्याच्या आरोग्य पथका कडून जिल्ह्यातील ४ हजार ४२४ व्यक्तिची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाइन मधे अजुन तब्बल १ हजार ५६४ व्यक्तींची वाढ झाल्याने येथे १८ हजार १९७ व्यक्ति दाखल झाल्या आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये १ क व्यक्ति कमी झाल्याने येथील संख्या ५२ झाली आहे. गाव पातळीवरिल संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये १ हजार ५०६ व्यक्ति कमी झाल्याने येथील संख्या १४ हजार ७१० झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये अजुन ५९ व्यक्ति वाढल्या असून येथील संख्या ३ हजार ४३५ झाली आहे. तर जिल्ह्यात नव्याने १ हजार ६०२ व्यक्ती दाखल झाल्याने २ मे पासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या १ लाख ५८ हजार २२७ झाली आहे. तर सद्यस्थितित जिल्ह्यात एकूण ३७ कंटेन्टमेंट झोन कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here