21 C
Panjim
Monday, January 24, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. या वादळाची झळ 57 घरे, 8 गोठे, इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्ता यांना बसल्याचे पुढे आले आहे. तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळात जिल्ह्यातील घरे, गोठे व इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल 57 घरे, आठ गोठे व इतर इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी 24 लाख 51 हजार एवढी आहे.

अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 3 जूनला सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकले.किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पाहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंची देखील कमालीची वाढली होती. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार पूर्णतः पडझड झालेल्या पक्याग घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्याचे नुकसान 4 लाख 26 हजार 700 एवढे आहे. अंशता पडझड झालेल्या पक्याया घरांची संख्या 37 एवढी असून त्याचे नुकसान पाच लाख 56 हजार एवढी आहे. अंशता पडलेल्या कच्च्या घरांची संख्या 18 असून नुकसानीची आकडेवारी 2 लाख 26,104 एवढी आहे. गोठ्यांच्या नुकसानीची संख्या 7 आहे. तर त्याचे नुकसान 42 हजार 480 एवढे आहे.

एका दुकानाची पडझड होऊन 5 हजार नुकसान झाले आहे. मत्स्य विभाग व बंदर विभागाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इतर खाजगी मालमत्ता नुकसान, अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे नुकसान, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान, ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे नुकसान, बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील स्टेजचे नुकसान अशा एकूण 7 घटनांमधून 24 लाख 51 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -