30 C
Panjim
Saturday, December 3, 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णाची संख्या १६ वर

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १६ वर पोहचली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. यामध्ये कणकवली तालुक्यातील डांबरे गावात ४ रुग्ण, ढालकाठी येथील २, मालवण तालुक्यातील -हिवाळे येथील १ तर वैभववाडी -नाधवडे येथील १ रुग्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले, त्यातील ५ रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले असून 3 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या ३ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती  जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. नव्याने सापडलेल्या ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles