सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आंबोलीचे अंतरंग

0
223

सिंधुदुर्ग – मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर असून मान्सूनपूर्व पावसाची सुरूवात झालेली आहे. हाच मान्सून निसर्ग आणि त्यातील घटकांसाठी अमृतमय संजीवनीच असतो. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा हॉट स्पॉट समजल्या जाणाऱ्या आंबोली परिसरात तर पावसाळ्यात वनस्पती, जलचर, उभयचर आदी जैवविविधतेतील मुख्य घटकांचे हे जणू अद्भुत विश्वच पाहायला मिळते. हे जीव पावसाळ्याच्या कालावधीत काही दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती, जलचर, उभयचर आंबोली परिसरात आढळून येतात. त्यामुळे पर्यटकांसाठी आंबोली वर्षा पर्यटनसह रात्रीची हे निसर्गाची किमया असलेले एक अद्भुत विश्व हे अविस्मरणीय पर्वणीच असते.

 

निसर्गातील वनस्पती, जलचर, उभयचर हे दरवर्षी मान्सून पूर्व पाऊस सुरू होण्याआधी मान्सून आगमणाचे संकेत देतात. आणि आपले काही दिवसांचे अतिस्त्व असलेले हे उभयचर, जलचर व वनस्पती एक अद्भुत विश्वाचे आश्चर्यकारक चमत्कारच दाखवत असतात. याच दरम्यान आपण निसर्गातील अन्नसाखळी ही प्रत्यक्षात पाहता येते. आंबोली परिसरात फक्त पावसाळ्यात सक्रिय असलेले हे विशिष्ट विविध प्रजाती प्रत्यक्षात पाहता येतात. मे महिन्याच्या शेवट मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सून आगमन यांचे संकेत सदर जीव देत, साधारण जून ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत जैवविविधतेतील दुर्मिळ व अतिदुर्मिळ तसेच नवनवीन प्रजातीचे हे जीव सक्रीय असतात. आजवर टीव्हीवर पाहिलेले प्राणी जगत प्रत्यक्षात पाहात त्यांची फोटोग्राफी करने ही मजा काही औरच असते.

 

दरम्यान, आपल्या विविधतेने साप, बेडुक, किटक, वनस्पती आदीं हे अगदी सर्वांना आकर्षित करणारे असतात. सापामध्ये सर्वात जास्त अभ्यासकांना आवडणारा पिट वायपर (चापडा) हा साप आपल्या तिन्ही रंगाच्या शेडमध्ये येथे सापडतो. त्यातील आंबोली शैलटेल, गवत्या, बांबूपीट वायपर, क्रेट (मण्यार), उडता सोनसर्प, नाग, हरणटोळ आदी तर ग्लायडींग फ्रॉग (उडता बेडुक), डांसिंग फ्रॉग, रिंकल फ्रॉग, फक्त आंबोलीत आढळून आलेला आंबोली तोड यासारखे इतर बेडुक, पाण्यातील, पाडावरील व खडकातील खेकडे, टॅरंटूलासह विविध कोळी, विविध किटक, पतंगे, पक्षी, वनौषधी, ओडोनाटा, फुलपाखरे, मासे आदी जैवविविधतेतील घटकांचे येथे प्रत्यक्षात अद्भुत विश्वच पाहू शकतो. यावेळी या जीवांची अन्नसाखळीसह जीवनचक्र येथे सहज पाहाता येथे हे विशेष.

साप हे शिकार करताना किंवा शिकारीच्या तयारीत एकाच जागी कित्येक दिवस घात लावून बसलेले आढळून येतात. तर बेडुक हे जून ते ऑगस्ट कालावधीत सक्रिय असल्याने सापांचे ते एक आवडते खाद्य असते. त्यामुळे विविध जातीचे येथे सापही सहज आढळून येतात. तर बेडकांमध्ये पश्चिम घाटातील काही भागात आढळणारा ग्लायडिंग फ्रॉग हा एक मुख्य आकर्षणाचा केंद्र असतो. हा बेडुक उंच झाडावर पानांच्या रंगात मिसळून गेलेला असतो. सूर्यस्तानंतर हा बेडुक सक्रिय होतो. साधारण २ ते ३ महिने हा बेडूक सक्रिय असतो. अन् रात्रीच्यावेळी आकर्षक आवाज काढत असतात. आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना तुम्ही याला पाहू शकता.

हा बेडुक पाण्यावरील झाड्याच्या फांदीच्या पानांवर आपले पांढऱ्या फेसाचे (आवरण) घरटे बांधत त्यात अंडी सोडतो. त्याचे मादीसह नर रक्षण करत असतो. अंड्यांमध्ये ताडपोल जेव्हा सक्रिय झाल्यावर ते थेट फेसाच्या आवरणातून थेट पाण्यात पडतात हे विशेष. तर रिंकल फ्रॉग हा शिळ घालत असतो. आणि एका पानावर अंडी देतो. त्यात त्याचे ताडपोलची वाढ आपल्या डोळ्यानी पाहता येते. तर डांसिंग फ्रॉग हा मादीला आकर्षित करण्यास आपला एक पाय पाण्यात जणू नाच केल्यासारख आपटत असतो. अशी विविध जीवांची प्रत्यक्षात येथे धम्माल पहाता येते. तसेच कॅमेराबद्धही क्षण करता येतात. तर अल्पावधीचे आयुष्य असलेले हे जीव प्रत्यक्षात पाहाने त्यांचे जीवनचक्र व प्रवास हे एक चमत्कारच असल्याचे आभास होतो. यातून एक आव्हानात्मक आणि जीव वाचवण्याची शिकारीची धडपड या जीवांची धडपड पाहता येते.

आंबोली परिसरात अद्यापही जैविविधतेच्या या घटकांवर अभ्यास, संशोधन शोध होने बाकी आहे. तर दरवर्षी पावसाळ्यात दुर्मिळ किंवा अतिदुर्मिळ तसेच नवनवीन प्रजातींचे शोध सहजरित्या लागत असते. यासाठी पावसाळ्यातील सुरूवातीच्या अल्प कालावधीत असंख्य अभ्यासक, फोटोग्राफर, निसर्गप्रेमींसह पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत निसर्गाची अद्भुत दुनिया पाहात असतात. मग आताच्या पावसाळ्यात तुम्हीही आंबोली वर्षा पर्यटनसह या जलचर व उभयचर यांची दुनिया एक ‘अविस्मरणीय ठेवा’ म्हणून अनुभवू शकतात. तर सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनासह वनस्पती, जलचर, उभयचर यांच्या विश्वासाचा अनुभव घेता यावा म्हणून आंबोली टुरिझमकडून विशेष तयारीसह तज्ञ गाईडही उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फायदा पर्यटक घेऊ शकतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here