सिंधुदुर्ग कासार्डे येथिल अकरावीचा विद्यार्थी दिग्विजय जाधवने शोधले कॅश सॅनिटायझर यंत्र

0
218

सिंधुदु – कोरोना प्रसार रोखण्यासाठी सतत हात धुवा, हाताला सॅनिटायझर लावा,मास्क लावा असे अनेक उपाय सध्या केले जात आहेत.तरीही खरेदी विक्रीत होणारऱ्या नोटांच्या, नाण्यांच्या देवाण घेवाणीतूनही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या नोटा सॅनिटायझेशन करणे दुकानदारांसमोर सध्या जिकरीचे काम होवुन बसले आहे.पण,यावर कासार्डेतील दिग्विजय मुकुंद जाधव या अकरावीच्या विद्यार्थ्यांने भन्नाड शोध लावला असून त्याने कोरोना बरोबरच इतरही विषाणुचा नायनाट करणारे “कॅश सॅनिटायझर” छोटेशे यंत्र बनवले आहे. अल्ट्रावायलेट लाईटचा वापर करून त्याने कॅश सॅनिटायझर बनवला आहे. ही लाईट त्याने सर्व सिस्टिमसह कॅश ड्रॉवरला बसवली व त्याचा प्रकाश फक्त कॅशवरच पडेल अशी रचना करून घेत हे यंत्र अखेर त्याने कार्यान्वित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here