27 C
Panjim
Friday, September 30, 2022

सिंधुदुर्गात २२ कोटी ३७ लाख रुपयांची व्हेल माशाची उल्टी जप्त तस्करी करणाऱ्या ४ पुरुष व २ महिलांना एलसीबी ने घेतले ताब्यात

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. देवगड पवनचक्की परिसरात सापाला रचून सुमारे २२ कोटी ३७ लाख रुपयांच्या व्हेल माशाच्या उल्टी सदृश्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या ४ पुरुष व २ महिलांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी ( दिनांक २२ ) रोजी देवगड पवनचक्की गार्डन परिसरात सापाळा रचण्यात आला. यावेळी या भागात संशयास्पद वावरणाऱ्या ४ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दाराप्रमाणे व्हेल माशाच्या या उल्टी सदृश्य पदार्थाची किंमत २२ कोटी ३७ लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या ६ आरोपीकडून व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थासह एक चारचाकी व एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तर या संशयित आरोपीविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४२,४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, पोलीस हवालदार अनुपकुमार खंडे, अनिल धूरी, प्रमोद काळसेकर, रुपाली खानोलकर, पोलीस नाईक अमित तेली, संकेत खाइये, पोलीस कॉन्स्टेबल रवि इंगळे, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर हे सहभागी झाले होते.

triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung Hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img